top of page
08a1188d42cd8b1d340da91c4cf14ee1
FarmRows-1250x650
lucas-marconnet-680286-unsplash
hero-aakash
f105da60862ba6db73e435a7a74f5401
brown-scale-houseplant-pest
AirBrush_20200311092733_edited.jpg

Agriculture

The word enough to Inspire.......

  • ५ टक्के निंबोळी अर्क तयार करण्यासाठी ५ किलो निंबोळी फ़डक्यात बांधून किंवा मोकळी १० लिटर प्लास्टिकच्या बादलीत पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी.

  • निंबोळी भिजविताना बादली व्यवस्थित झाकून ठेवावी. त्याचबरोबर निंबोळी पावडर भिजविण्यासाठी थंड पाणी वापरावे. कारण गरम पाण्याने निंबोळी अर्कामधील सक्रिय घटक कमी होऊ शकतात.

  • रात्रभर निंबोळी पावडर पाण्यात भिजल्यानंतर व्यवस्थित फ़डक्याने गाळून घ्यावे. गाळून काढलेली निंबोळी पावडर एखाद्या झाडाला खत म्हणून टाकावी. गाळून घेतलेल्या पाण्यात जास्तीचे पानी १०० लिटर होइपर्यंत मिसळावे, अशा प्रकारे १०० लिटर अर्क तयार होईल.

  • हा अर्क फ़वारणीसाठी वापरताना त्यात चांगल्या दर्जाचे स्प्रेडर-स्टीकर टाकावे. यामुळे फ़वारणी व्यवस्थित पिकावर पसरुन उत्तम परिणाम मिळतील.

maxresdefault.jpg

निंबोळी अर्काचे फ़ायदे:-

  • १) संपूर्णपणे नैसर्गिक स्रोतांपासुन तयार होत असल्यामुळे खर्च अतिशय कमी येतो.

  • २) निंबोळी अर्काच्या फ़वारणीमुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. सर्व प्रकारच्या पिकांवर १५ दिवसांच्या अंतराने नियमीत फ़वारणी घेतल्यास, रस शोषक किडींच्या जीवनचक्रात अडथळा येऊन किडींचे नियंत्रण होते.

  • ३) किडींच्या जीवनचक्रामध्ये पतंगवर्गीय किडींना अंडी घालण्यापासुन परावृत्त केले जाते तसेच रसशॊषक किडींचेदेखील अंडी घालण्याच्या नैसर्गिक क्रियेमध्ये अडथळा येतो. त्यामुळे एकूणच जीवनचक्रामध्ये अडथळा येतो.

  • ४) नैसर्गिक घटक असल्या कारणाने कोणत्याही प्रकारचे रासायनिक अंश राहत नाही. यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये वापर करण्यास सुलभ आहे. निर्यातीसाठीच्या भाजीपाला पिकामध्येदेखील याची फ़वारणी फ़ायदेशीर ठरते.

  • ५) कीटकनाशकांसोबतदेखील वापरता येत असल्या कारणाने तसेच एकात्मिक कीड नियंत्रण पध्दतीमध्ये वापरण्यास अगदी सोपे असे हे नैसर्गिक कीडनाशक आहे.

  • ६) पांढरी माशी, मावा, फ़ुलकिडे, विविध प्रकारच्या अळ्यांचे देखील नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. मोठ्या अळ्यांचे नियंत्रणात निंबोली अर्काची जास्त मदत होत नाही यासाठी अळी लहान अवस्थेत असतानाच निंबोळी अर्काची फ़वारणी करावी.

AirBrush_20200507182359 - Copy.jpg

डॉ. विवेक सवडे

​एम. एस. सी. (कृषि) पी. एच. डी., नेट (कृषि किटकशास्त्र)

​वरिष्ट शास्त्रज्ञ, ATGC biotech Pvt. Ltd.

IMG20200602155252.jpg

डॉ. धिरजकुमार कदम

​सहयोगी प्राध्यापक कृषि किटकशास्त्र विभाग,

व.ना.म.कृ.वि. परभणी-४३१४०२

WhatsApp Image 2020-06-04 at 4.12.47 PM.

डॉ. संजय पाटिल

​सहयोगी प्राध्यापक कृषि किटकशास्त्र विभाग,

कृषि महाविद्यालय बदनापुर व.ना.म.कृ.वि. परभणी-४३१४०२

© 2020 सत्यमेव जयते, कृषिमेव जयते

  • Facebook Clean
  • LinkedIn Clean
bottom of page